जागरूक पालक सुदृढ बालक अभियानांतर्गत आरोग्य तपासणी.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगांव : – दि.१० फेब्रुवारीला ना.ना.मुंदडा विद्यालयात जागृत पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत मुलांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ता.9 रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते या शिबिराला प्रमुख म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष बोरसे व वैद्यकीय अधिकारी डॉ मनिष बोरकर, मुंदडा विद्यालयाचे प्राचार्य दिनेश उंटवाल, तसेच अध्यक्ष म्हणून जऊळका जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या सौ. कल्पना राऊत, मालेगाव नगर पंचायतचे माजी नगरसेवक गजानन सारसकर,महाकाळ उपस्थित होते.शिबिराचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डाँ बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यावेळी डॉ बोरसे यांनी या अभियानांतर्गत बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाणार आहे.तसेच शुन्य ते अठरा वर्षेच्या शालेय विद्यार्थ्यांची वजन,उंची,यासह क्षयरोग, कुष्ठरोग, अस्थमा,ह्रदयरोग,कंन्सर व मानसिक स्वरूपाच्या व इतराचे निदान व आजारांवर उपचार केला जाणार असल्याचे सांगितले.यावेळी डॉ मनिष बोरकर व कल्पना राऊत यांनीही मार्गदर्शन केले यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी देवकते, तसेच पंचायत समितीचे आरोग्य कर्मचारी सहदेव उत्तमराव चंद्रशेखर,वैद्यकीय अधिकारी डॉ मनिष बोरकर साळुंके,प्रकाश नागलकर,शर्माजी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी,कर्मचारी,शाळेचे विद्यार्थी व शिक्षक तसेच मालेगाव उपकेंद्रातील आरोग्य सेविका,आरोग्य सेवक ,गटप्रर्वतक आशा स्वयंसेविका उपस्थित होते.



