चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत किती उमेदवार असतील याचे माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे

पुणे!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत किती उमेदवार असतील याचे माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
आज (शुक्रवारी) माघार घेण्याच्या मुदतीत 5 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक रिंगणात 28 उमेदवार राहिले आहेत.
त्यात भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत होईल.
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 128 जणांनी 231 अर्ज नेले होते. त्यापैकी 40 जणांनी 53 अर्ज भरले होते. अर्जाच्या छाननीमध्ये 53 अर्जांपैकी 40 अर्ज पात्र तर सात उमेदवारांचे 13 अर्ज अपात्र ठरले. त्यानंतर या निवडणूक रिंगणात 33 उमेदवार शिल्लक राहिले. शुक्रवारी 33 पैकी 5 उमेदवारांनी माघार घेतल्याने 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, रविंद्र पारधे, राजेंद्र काटे, भाऊ अडागळे, मनिषा कारंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.







