विदर्भसंपर्कसामाजिक

समता सैनिक दलांचा पदवीदान समारंभ व सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

अजय गायकवाड

भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष-बोधिसत्व डॉ. बाबसाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षण- आद.महा उपाशिका मिराताई यशवंत आंबेडकर ट्रस्टीचे आयोजन चेअरमन – डॉ. हरिष रावलिया राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील , ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष -आद. भीमराव यशवंत आंबेडकर , भारतीय बौद्ध माहासभा वाशीम जिल्हा अध्यक्ष – सिद्धार्थजी भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्ह्यातील बांधवांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय अध्यक्ष आद. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी केलेल्या संकल्पा नुसार एक लाख समता सैनिक दल यांची फौज उभी होणार आहे हे उदिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जास्तीत जास्त सैनिक निर्माण करण्याच्या उद्देशाने समता सैनिक दलाच्या सैनिकांचा सैनिक भर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नविन सैनिकांना योग्य मार्गदर्शन, तसेच बरेच वर्षापासून समता सैनिक दलात कार्य करून उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली. यांचा मुंबई येथील कार्यक्रमात पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्या पदवीदान समारंभाचे व स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १२ / ०२ / २०२३ वार रविवार रोजी सकाळी १०=०० वाजता महात्मा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, नालंदा नगर, वाशिम येथे करण्यात आले आहे. सैनिक परेड सकाळी १० वाजता पासून नंतर पदविदान होईल.

समता सैनिक दलासह वाशिम जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारणी, माजी सैनिक, व आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अश्विन खिल्लारे ( जिल्हा प्रमुख स,सै, द ) , छगन सरकटे ( जिल्हा सचिव ), गोपाल लबडे ( जिल्हा नियंत्रण अधिकारी ), अभिमन्यू पंडित ( जिल्हा सचिव ) आकाश इंगळे ( जिल्हा नियोजन अधिकारी ) , मिलिंद खडसे ( जिल्हा कार्यालयीन अधिकारी ) प्रदिप पट्टेबाहादुर ( प्रचार व संपर्क ) प्रेमजित इंगळे ( प्रचार व संपर्क ) यांनी केले असून या शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक अदा. आनंदा बेरजे ( मेजर जनरल )व एकनाथ बेर्डे ( मेजर जनरल ) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिर पार पडणार असुन जिल्हा सरचिटणीस देवानंद वाकोडे, जिल्हा कोषाध्यक्ष गोविंदराव इंगळे, संस्कार विभाग जिल्हा प्रमुख हरिश्चंद्र जी पोफळे, महिला विभाग प्रमुख संध्याताई पंडित, जिल्हा सचिव नागोराव उचित, पंढरीजी खिल्लारे,बळीराम पट्टे बहादुर, दिलीप गवई, हर्षल इंगोले,पि ,के भगत, डि एस कांबळे ,सुमन ताजने,, मंदाताई वाघमारे, शालिग्राम चुंबळे , भिमराव चव्हाण , वाशिम तालुका अध्यक्ष प्रा मुकुंद वानखेडे, रिसोड तालुका अध्यक्ष शालिग्राम पठाडे , मालेगाव तालुका अध्यक्ष अनिल तायडे म,पिर तालुका अध्यक्ष प्रमोद बेलखेडे, मानोरा तालुका नंदु वानखेडे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य व परिस्रम लाभनार आहे

तसेच ज्यांना समता सैनिक दलात नव्याने सहभागी होण्याचे आहे . त्याकरिता समता सैनिक दल भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी नोंदणी फी २० रू भरुन आपल्या नावाची नोंदनी समता सैनिक दल विभाग कडे जमा करावी व जास्तीत जास्त सैनिकांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button