राहेर येथे शेत मजुरांची गळफास घेत आत्महत्या

*राहेर येथे शेत मजुरांची गळफास घेत आत्महत्या*
चान्नी पोलिसांनी केली आकस्मित मृत्यूची नोंद
स्टारभारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला तालुका प्रतिनिधी मुकेश संतोष हातोले पातूर:– तालुक्यातील राहेर येथे शेत मजुरांची राहत्या घरात लोखंडी एँगलला साडीच्या साह्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, तुळशिराम वामन पवार वय (58) शेत मजुर) यांनी गुरुवार (दि. 9 फेब्रुवारी पहाटे च्या दरम्यान यांनी आपल्या राहत्या घरात आडगईच्या लोखंडी एँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे उपनिरी

क्षक गणेश महाजन पो.काॅं सुधाकर करवते यांनी घटनास्थळी भेट देत. पंचनामा केला असून अकोला सर्वोपचार रुग्णालय शवविच्छेदन केले याप्रकरणी चान्नी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो काॅं सुधाकर करवते करीत आहेत.




