बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

एकलारा-पेनसावंगी रस्त्याचे रखडलेले काम आठ दिवसांत पूर्ण करा….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी…

        अन्यथा तालुका किसान काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

  चिखली : तालुक्यातील एकलारा-पेनसावंगी या महत्त्वाच्या मार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. परिणामी एकलारा, पांढरदेव, पाटोदा, भोरसा भोरसी, पेनसावंगी आणि नायगाव या गावांतील हजारो नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष समाधान आकाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उपविभागीय अभियंता सार्वजनीक बांधकाम उपविभाग, चिखली यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असले तरी दुसरी बाजू अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे या मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू असून वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अनेकदा दोन-दोन तास वाहनांच्या रांगा लागत असल्याने शेतकरी, व्यापारी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावरील काम अपूर्ण असल्यामुळे एस.टी. बससेवाही प्रभावित झाली आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत असून त्यांचा आर्थिक व शैक्षणिक फटका बसत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे काम रखडल्याने भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, एकलारा-पेनसावंगी रस्त्याचे उर्वरित काम येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाधान आकाळ यांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button