बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसांस्कृतिक

गोळेगाव बु।येथे प्रजासत्ताक दिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात।चिमुकल्या विद्याथ्र्यांचे कौतुक पाहुन गावकरी गेले भारावून

गोळेगाव बु।येथे प्रजासत्ताक दिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात।चिमुकल्या विद्याथ्र्यांचे कौतुक पाहुन गावकरी गेले भारावून शेखशेगांव प्रतिनिधी,

आज दिनांक26जानेवारी2023रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळेगाव बु।येथील जिल्हा परिषद शाळेत सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली नंतर ध्वजारोहण करण्यात आले आणि नंतर सौंस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,या सर्व कार्यक्रमात देशभक्ती , विर जवानांची आणि महापुरुषाची गीतानवर येथिल चिमुकल्या 1ते4च्या विध्यार्थी यांनी नृत्य सादर केले या चिमुकल्या विद्याथ्र्यांचे नृत्य पाहून गावकरी व पालक भारावून गेले होते, गोळेगाव बु।येथिल जि, प, शाळेत या वर्षी पहिल्यांदाच नवनियुक्त शाळा समिती अध्यक्ष धम्मपाल समदूर आणि स्था,प्र, सदस्य देवचंद्र समदूर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे गावकऱ्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे नृत्य पाहण्यासाठी खुप मोठी गर्दी केली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता,आणि आपण सुद्धा कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगले नृत्य करून सौंस्कृतीक कार्यक्रम करू शकतो असा आत्मविश्वास आज येथिल विद्यार्थ्यांनी वर्तविली आहे।त्यामुळे काही पालकांनी तर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण हे सोन आहे आणि आपली पाल्य यापुढे जिल्हा परिषद शाळेतच शिकविण्याचा निर्धार केला कारण येथील विद्यार्थी हे शिक्षनात नव्हे तर सौंस्कृतीक कार्यक्रमात सुध्दा आज अव्वल ठरले आहेत,या कार्यक्रमाला गोळेगाव खुर्द येथिल चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता तसेच येथील अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवून एका चिमुकल्या अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांने भारताचे संविधान म्हणून दाखविले ,अशाच प्रकारचे सौंस्कृतीक कार्यक्रम प्रत्येक जि, प, शाळेत घेतल्यास विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढेल आणि ह्या शाळा पटसंख्या अभावी बंद पडण्यापासून वाचतील असे प्रतिपादन सुद्न्य नागरिकांचा चर्चेचा विषय या कार्यक्रमानिमित्त बनला होता।या कार्यक्रमाला उपस्थित मुख्याध्यापक एस, एस, पिलात्रे सर,सुनिल बोरीकर सर,गोळेगाव खुर्द चे मुख्याध्यापक ओमप्रकाश इंगळे सर, अंगणवाडी सेविका माया गव्हाळे मॅडम, मदतनीस नंदाबाई सिरसाट, मा, पोलीस पाटील मधुसूदन तायडे, सरपंच रघुनाथ मापारी, उपसरपंच सुनीता गावंडे, ग्रा, प, सदस्य, शाळा समिती, पालक आणि शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते।सौंस्कृतीक कार्यक्रमानंतर व्यवहारीक ज्ञान वाढण्यासाठी विद्यार्थ्यांची खरी कमाई आनंद मेळावा सुद्धा घेण्यात आला होता

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button