महाराष्ट्र

सिरसोली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न, अनेकांना केले चष्म्याचे वितरण!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका
प्रतीनिधी

सिरसोली; तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथील स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या आठवड्यात मोफत नेत्र तपासणी , मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच अनेक गरजूंना चष्म्याचे वितरण करण्याचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले होते.
दम्माणी नेत्र रुग्णालय,
रोटरी क्लब हँगिंग गार्डन, मुंबई , स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सिरसोली आणि कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी, अकोला या विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या एक दिवसीय आयोजित शिबिरामध्ये लोहारी, पाथर्डी , अडगाव खु., जळगाव नहाते , काळेगाव, भोकर, वरुड बु., राणेगाव व सिरसोली येथील तब्बल ३७० हुन अधिक नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १३३ मोतीबिंदू चे निदान झालेल्या रुग्णांवर स्थानिक दम्माणी नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया टप्प्या टप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे
या शिबिरात तब्बल १०० हुन अधिक गरजू रुग्णांना जवळच्या नंबर चे चष्मे १०० रु. नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात आले.
या शिबिराचे उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून सिरसोली येथील ज्ञानगंगा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य मा. श्री. सुरेशदादा खोटरे हे असुन दम्माणी नेत्र रुग्णालयाचे मुख्य प्रशासनिक अधिकारी मा. श्री. सभापती शुक्ल यांचे हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले होते.
संस्थेचे सचिव माजी आमदार वसंतराव खोटरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
…उदघाटन प्रसंगी ‘ कस्तुरी चा सेवाभाव आणि स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालयातील प्राचार्य मिलिंदजी खोटरे आणि टीम तसेच विद्यार्थ्यांचा सेवाभाव प्रेरणादायी आहे’ त्याचप्रमाणे दम्माणी नेत्र रुग्णालय व कस्तुरी तसेच स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालयाच्या पुढाकाराने सिरसोली परिसरात मोतीबिंदू रुग्ण निर्मूलन अभियान राबवू असे प्रतिपादन मा. श्री. सभापती शुक्ल यांनी या कार्यक्रमात बोलतांनी केले.
या शिबिराच्या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक व संचलन प्राचार्य मिलिंद खोटरे यांनी तर आभार प्रदर्शन मा. वसंतराव खोटरे यांनी केले. याप्रसंगी कस्तुरी चे संस्थापक प्रा. किशोर बुटोले व मा. श्री. सुरेशदादा खोटरे यांनी समायोचित विचार मांडले.
शिबिरार्थिंना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी एक संपर्क समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत मा. सर्वश्री उमेश चोपडे सर, वजाहत अली सर, डॉ. संतोष ताकोते, विजयराव ढोरे, दिपक मुंढे सर, महादेवराव फड सर, आरती नाफडे मॅडम, प्रा. सदानंद बाणेरकर सर, प्रदीप राऊत, दामोदर कपले, प्रवीण इंगळे, लालसिंग अडाणी आणि युवा पत्रकार विनोद सगणे यांचा समावेश होता.
शिबिराच्या आयोजनासाठी मा. प्राचार्य श्री. मिलिंद खोटरे यांच्या नेतृत्वात एका संयोजन समितीचे गठन करण्यात आले होते. त्या संयोजन समितीत डॉ. संदीप इंगळे, प्रा. संतोष नहाटे, श्री. राजेश तेलगोटे आणि प्रा. किशोर बुटोले यांचा समावेश होता.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी दम्माणी रुग्णालयाची चमू डॉ. पवार, श्री. अजय देशमुख व राजू मुदलियार तसेच संजय बुटोले, ज्योती सुलताने,
बाबासाहेब खोटरे विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद खोटरे , शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कमालीची कसरत केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button