किनी च्या सहायाने वाळू उपसा जोरात महसूल विभागाचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष जिल्हा प्रशासन कार्यवाही करेल का ?

किनी च्या सहायाने वाळू उपसा जोरात महसूल विभागाचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष जिल्हा प्रशासन कार्यवाही करेल का ?
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वृत्तसेवा
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव
तालुक्यातील भोनगाव,भास्तन, खातखेड,खिरोडा या शिवारातुन पुर्णा नदि च्या पात्रातुन, दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर, किनी च्या सहायाने वाळू उपसा केला जात आहे , महत्त्वाचे म्हणजे वाळु चा लिलाव होणे बाकी आहे होत असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ठिक ठिकाणी राहुट्या उभारल्य आहेत, पण त्या राहुट्या मध्ये महसूल विभागाचा एक ही कर्मचारी हजर राहत नाही हे विशेष, दिवसा ढवळ्या भोनगाव पुर्णा नदिवर 8 ठिकाणी किणी च्या सहाय्याने वाळु उपसा सुरु आहे ज्या ट्रॅक्टर व टिप्पर नी अवैध वाळू उपसा केला जातो, त्या सर्व गाड्या बिना नंबर प्लेट च्या असुन , हि वाहने रस्त्यावर सुसाट वेगाने रस्त्यावर धावतात, यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही , या बिना नंबर प्लेट ची वाहनांव पोलिस प्रशासन कार्यवाही करेल का, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाचा लाखो रुपये चा महसूल चोरी जात आहे हे विशेष,



