बुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

भुयारी मार्ग कृती समितीच्या वतीने आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलन

भुयारी मार्ग कृती समितीच्या वतीने आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलन*

*शेगांव (प्रतिनिधी)* शहरातील पूर्व भागात रेल्वे लाईन जवळ राहणारे निवासी नागरिक. शेगाव शहरातील गेट क्रमांक 27 रेल्वे प्रशासनाकडून बंद केल्याने शहरातील नागरिकांसाठी असु विधाजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे.गेट बंद केल्यानंतर त्या जागी उडान पूल बांधण्यात आला. मात्र उडान पुलावुन चढण्यासाठी ६० व उतरण्यासाठी ६० असे एकूण १२० पायऱ्यांची चढ उतार करणे वृद्ध नागरिक गरोदर स्त्रिया लहान मुले व दिव्यांगांना शक्य नाही त्यामुळे उड्डाणपूलाचा समावेश उपयोग केवळ वाहतुकीसाठी होतो पायदळ नागरिकांना याचा काही उपयोग होत नाही.याकरिता बंद झालेल्या रेल्वे गेट क्रमांक २७च्या जागी व लखपती गल्लीच्या तोंडावर भुयारी मार्ग केला जावा.याकरिता आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.उड्डाण पुलावरून चढून जाणे शक्य नसल्याने पायदळ जाणारे धनगर नगर व ओम नगर मधील नागरिक रेल्वे गेट क्रमांक २७ च्या जागेवरून ये जा करीत होते. तर होलारवाडा,सरकारी फैल,छत्रपती शिवाजीनगर, रेल्वे कॉलनी,ओम नगर,हाय फाय कॉलनी,या भागातील नागरिक लखपती गल्ली मार्गाचा वापर करीत होते.मात्र आता या दोन्ही ठिकाणी रेल्वे कडून संरक्षण भीत बांधली गेली आहे.त्यामुळे उपयुक्त भागातील नागरिकांना उड्ढालपुरलावरून ये जा केल्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.आणि उद्यावरून एकूण १२० पायऱ्यांची चढउतार करणे अशक्य आहे.त्यामुळे संरक्षण भिंत बांधल्यानंतर जवळपास १५ हजार लोकांची एका प्रकारे कोंडी झालेली आहे.ज्यामुळे सर्वांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे गेट क्रमांक 27 च्या जागी व लखपती गल्लीच्या तोंडावर नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाच्या निर्मितीची नितांत गरज आहे.काही दिवसापूर्वी भुयारी मार्गाच्या निर्मितीच्या अनुषंगाने स्पोर्ट निरीक्षण करण्यात आले होते नगर परिषद कडून भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा ठराव ही रेल्वे विभागाला देण्यात आलेला होता तरी नागरिकांना होत असलेल्या चा दूर करण्यासाठी बंद केलेल्या रेल्वे गेट क्रमांक २७ च्या जागी व लखपती गल्लीच्या तोंडावर मार्ग म्हणून भुयारी मार्गाची निर्मिती तत्काळ केली जावी.. अशी मागणी नागरिकांनी संबंधित अधिकारी यांना केली.स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button