ग्रामीण भागाच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल; उकळी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला सुरुवात;राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निवेदनाची प्रशासनाकडून दखल, अमोल व्यवहारे यांचा पाठपुरवठा यशस्वी:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दी.८/१०/२०२६.
ग्रामीण भागातील नागरिकांची सुरक्षितता वाढवणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि गावातील वाढत्या चोऱ्या व छेडछाडी सारख्या गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संग्रामपूर तालुक्यातील उकडी ग्रामपंचायत परिसरात महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल व्यवहारे यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
चार महत्त्वाच्या ठिकाणी तिसरा डोळा:
सध्याच्या डिजिटल युगात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे चे महत्त्व अनन्य साधारण आहे. याच पार्श्वभूमीवर उकळी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत गावातील मुख्य आणि संवेदनशील अशा प्राथमिक चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसेल आणि गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार आहे.
तपासासाठी व्हिडिओ पुरावे होणार उपलब्ध:
गावामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे मुख्य चौक आणि रस्त्यावरील प्रत्येक हालचालीवर 24 तास लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी तोडफोड, चोरी, छेडछाड किंवा इतर कोणतेही गैरप्रकारांना यामुळे आळा बसेल. तसेच एखादी अनुसूचित घटना घडल्यास पोलिसांना तपासणीसाठी तात्काळ ठोस व्हिडिओ पुरावे उपलब्ध होणार असल्याने गुन्हाची उकल करणे सोपे होणार आहे. ग्रामीण जनतेने या निर्णयाचे उस्फूर्त स्वागत केले आहे.
तालुक्यातील सर्व 50 ग्रामपंचायतीमध्ये कॅमेरे बसवण्याची मागणी:
संग्रामपूर तालुक्यामध्ये एकूण 50 ग्रामपंचायती येतात. उकडी प्रमाणे तालुक्यातील इतर सर्वच गावांना या सुरक्षेच्या कवचाची अत्यंत गरज आहे. या सर्व 50 ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील मुख्य चौक. गजबजलेली बाजारपेठ, बस स्थानक, शाळा-महाविद्यालये, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बॅंका आणि गावाचे मुख्य प्रवेश व निर्गमन मार्ग कशे सर्व प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात यावी. अशी मागणी जोर धरत आहे.
“ग्रामीण भागातील माता भगिनींची सुरक्षा आणि नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे उकळी येथे कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली असली, तरी जोपर्यंत संग्रामपूर तालुक्यातील सर्व 50 गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात नाहीत, तोपर्यंत आमचा हा लढा आणि प्रशासनाकडील पाठपुरावा सातत्याने सुरूच राहील”.
अमोल व्यवहारे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस संग्रामपूर)…..,✍️



