टंचाईच्या परिस्थितीत योजना प्रभावीपणे राबवून नागरिकांना दिलासा द्या – सीईओ गुलाबराव खरात यांच्या सक्त सूचना*

*सिंदखेड राजा ; तालुक्यात निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सक्त सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी *गुलाबराव खरात* यांनी दिल्या आहेत.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
टंचाई आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी खरात म्हणाले,
१. पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा – गावागावात पाणीटंचाई भासू नये यासाठी टँकर, विहीर अधिग्रहण व नळ योजनांच्या दुरुस्तीचे नियोजन आतापासूनच करा.
२. पशुधनासाठी चाऱ्याचे नियोजन – चारा डेपो व छावण्यांची तयारी ठेवा, पशुधन उपाशी राहणार नाही याची दक्षता घ्या.
३. घरकुल योजना गतीने राबवा – मंजूर घरकुलांचे काम तातडीने पूर्ण करून लाभार्थ्यांना निवारा द्या.
४. नरेगा मधून जलसंधारणाची कामे घ्या – रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त जलसंधारणाची तसेच वैयक्तिक लाभाची कामे हाती घेऊन नागरिकांना रोजगार व दिलासा द्या.
या संकटाच्या काळात प्रशासनाने संवेदनशीलतेने परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अतिरिक्त सीईओ बाळासाहेब मोहन, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, वित्त व लेखा अधिकारी प्रकाश राठोड, गटविकास अधिकारी अजित बांगर, सौदागर पवार, सीडीपीओ जीवन राठोड, अभियंता गिरीश मालोकर यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.



