खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणाबोदवड

संविधान प्रेमी व महाविकास आघाडी बुलढाण्यात आक्रमक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

जळगाव ( जामोद). दि.८/१०/२६ सविस्तर वृत्त असे की महाविकास आघाडी व संविधान प्रेमी यांच्या वतीने राष्ट्रपतींना उद्देशून जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. एस आय आर प्रक्रियेवरून महाविकास आघाडी व संविधान प्रेमी नागरिकांनी बुलढाण्यामध्ये निवडणूक आयोगा विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मतदार यादीतील नाव वगळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अशी मागणी सुद्धा संविधान प्रेमी आणि महाविकास आघाडी यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. एस आय आर प्रक्रियेला स्थगिती देऊन सर्वपक्षीय समितीमार्फत चौकशी करायची वगळण्यात आलेली नावे पुनस्थापित करावीत आणि संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी निश्चित करावी अशा प्रमुख मागण्या याच वेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. एस आय आर च्या माध्यमातून गरीब वंचित व अल्पसंख्यांक मतदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप सुद्धा आंदोलन कर त्यांनी केला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी भाषणातून केंद्र सरकारवर जोरदार अशी टीका करत ज्ञानेश कुमार यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम निवडणूक आयोगातील दोन सदस्यांनी करून दाखविले आहे. ज्ञानेश कुमार यांना दोष देत नसलो तरी यामागे मोदी आणि शहा हे खरेदी असल्याचे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले आहे. सामान्य गरीब आणि वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावून घेतला जात असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करते आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. श्रीलंका पाकिस्तान आणि बांगलादेशातील परिस्थितीचा संदर्भ दिला. सरकारने मागण्या मान्य केल्या तर ठीक अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेंजित पाटील, जयश्री ताई शेळके, नरेश शेळके शिवसेना ( उभाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी. टी .जाधव, लक्ष्मणराव घुमरे, राम विजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे, वर्षा इंगळे, ज्योतीताई खेडेकर, इरफान पठाण, आशिष वायझोळे, जिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोंद्रे, समाधान दामोदर, पी. एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व संविधान प्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button