खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांना 50 हजाराची मदत द्या:कॉक्रोच जनता पार्टीचा सरकारला बारा दिवसाचा अल्टिमेट:मागण्या मान्य न झाल्यास 20 ऑक्टोबर पासून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दी.८/१०/२०२६.

संग्रामपूर तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक प्रश्नाकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी कॉक्रोज जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असताना शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार मात्र मदतीपासून वंचित असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.

यासंदर्भात कवी-दीपक भगवान उमाळे.रा. बोडखा.ता. संग्रामपूर.जि. बुलढाणा यांच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार, संग्रामपूर यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.
शेतमजुरांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली रोजगारांच्या स्वभावामुळे अनेक कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने स्वतंत्र समिती गठन करून शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांचे दारो दारी सर्वेक्षण करावे आणि त्यांना प्रत्येक पन्नास हजाराची आर्थिक मदत द्यावी. अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

या सोबतच शेत मुजरा वरील खाजगी कर्ज, सावकारी कर्ज, तसेच वाहन व इतर कर्जाचे हप्ते याबाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन आर्थिक दिलासा द्यावा, अशी ही मागणी करण्यात आली आहे.

मदत नाही तर आंदोलन:
शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी. यासाठी बारा दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत मागण्या मान्य करून ठोस निर्णय न झाल्यास वीस ऑक्टोबर 2026 पासून संग्रामपूर तालुक्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यातील तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
असा स्पष्ट इशारा कॉक्रोज जनता पार्टीने दिली आहे.
शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगार हे समाजातील महत्त्वाचे घटक असून त्यांच्या प्रश्नाकडे केवळ आश्वासन पुरवते न पाहता शासनाने प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि ठोस उपाययोजना करावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button