शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! दुष्काळामुळे खरीप करपले; नुकसानीचे पंचनामे सुरू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे, खामगांव
पावसाच्या अनियमितपणाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात सहन करावा लागला आहे. दुष्काळाच्या दाहकतेमुळे खरिपातील सर्व पिके होरपळली. मदतीचा हात म्हणून शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळाच्या मदतीवरच शेतकऱ्यांची आशा आहे. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष बांधावर जावून शेतकऱ्यांचा आक्रोश जाणून घेवू लागले आहे. जिल्ह्यात पंचनाम्यांची ५ ऑक्टोबर अखेरची तारीख असल्यामुळे शेवटच्या दिवशी शेताच्या बांधावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून खामगाव तालुक्यातील ढोरपगाव शिवारातील शेतात पिकांच्या नुकसानीची पाहणी करतांना अधिकाऱ्यांचे पथक
आली.खरिप हंगामातील पिकाला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी प्रमुख पिक सोयाबिन, कपाशी, उडीद, मूंगांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काहींना अत्यल्प उत्पादनावर समाधान मानावे लागलेतर तर काही शेतकऱ्यांवर शेतमाल तयार करण्याची वेळच आली नाही. अनेक महसूल मंडळात पेरणीनंतर पाऊस आला नाही. त्यामुळे अनेक शेतं पडीत राहिली आहे. शासनाने जिल्ह्याचाही समावेश दुष्काळाच्या यादीत केला आहे. त्यानुसार गेल्या शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या आदेशानुसार ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व महसूल अधिकारी या तिघांच्या पथकाच्या माध्यमातून शेताच्या बांधावर जावून पंचनामे केल्या जात आहे. नुकसानीबाबत
शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेतल्या जात आहे. जिल्ह्यातील पंचनामे पूर्णत्वास आले आहेत. आता शेतकऱ्यांना केवळ मदतीची अपेक्षा आहे. खामगाव तालुक्यातील ढोरपगाव, कुंभेफळ, भालेगाव बाजार शिवारातील शेतीतील पिकाचे पंचनामे रविवार ४ ऑक्टोबर रोजी पूर्ण करण्यात आले. अशी माहिती कृषी सहाय्यक महसूल अधिकारी यांनी दिली आहे.



