वृत्तसेवा साहित्य काव्य गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने लेखिका ज्योती सिनगारे सन्मानित

पोशिंदा या कवितेने जिंकली रसिकांची मने
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव मही : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देऊळगाव मही येथील प्रसिद्ध लेखिका, कवियत्री समाजसेविका सौ. ज्योती सिनगारे (वायाळ ) यांना मानाचा रानकवी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य द्वारा 100 वे मराठी काव्य संमेलना निमित्त ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच पुणे यांच्याकडून
वृत्तसेवा साहित्य काव्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे झालेल्या एका भव्य साहित्य संमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस उद्घाटक भाऊसाहेब भोईर निवृत्ती अण्णा बादल प्राध्यापक डॉक्टर शैलेंद्र बनगे प्राध्यापक हनुमंत धालगडे अभिनेत्री प्रीती पौळ पौळ सिने अभिनेते गुलाब राजा फुलमाळी अभिनेत्री मायाबोणे या मान्यवरांच्या हस्ते ज्योती सिनगारे यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरविण्यात आले.
ज्योती सिनगारे यांनी आपल्या कविता, कथा आणि लेखनातून ग्रामीण भागातील वास्तव, स्त्रियांच्या व्यथा आणि सामाजिक जाणिवा प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
या सन्मानामुळे बुलढाणा जिल्ह्यात एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी मुख्य आयोजक कवी सुभाष सोनवणे, दत्तू ठोकळे, जगदीप वनशिव व लोककवी सिताराम नरके राहुल जाधव यांनी शिस्तबद्ध काव्य संमेलनाचे आयोजन केले होते.



