खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवट बकाल येथे आरोग्य तपासणी ; तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला उपक्रमातून ८८ रुग्णांची तपासणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. 3 : सेवा संकल्प अभियान तसेच ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमांतर्गत आरोग्य वर्धिनी उपकेंद्र, वरवट बकाल येथे ‘तिशीचा पल्ला – तपासणी आणि सल्ला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ८८ रुग्णांच्या असंसर्गजन्य आजारांची (NCD) तपासणी करण्यात आली.

उपक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह आदी असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, वेळेवर निदान आणि उपचाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीदरम्यान उच्च रक्तदाबाचे ४, मधुमेहाचे १ आणि उच्च रक्तदाब व मधुमेह दोन्हीचे १ नवीन रुग्ण आढळून आले. तसेच ४८ नागरिकांचे तोंडाच्या कर्करोगाचे, तर ३३ महिलांचे स्तनाच्या कर्करोगाचे स्क्रीनिंग करण्यात आले. या दोन्ही तपासण्यांमध्ये संशयित रुग्ण आढळून आले नाहीत. एका नागरिकामध्ये मोतीबिंदू आढळून आला.

नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखूमुक्त जीवनशैली आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान करून त्यावर वेळीच उपचार घेणे तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी प्रणाली सोनवणे, एएनएम शीला वाघोदे, गटप्रवर्तक उज्ज्वला वानखडे तसेच आशा सेविकांनी सहभाग घेतला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button