जळगाव महामोर्चाच्या नियोजनासाठी मुक्ताईनगरात महत्त्वपूर्ण बैठक; मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन

मुक्ताईनगर, दि. १ ऑक्टोबर : जळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या नियोजनासाठी मुक्ताईनगर येथील रेस्ट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी मोर्चाच्या तयारीसह तालुक्यातून जास्तीत जास्त समाजबांधव व कार्यकर्त्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्ह्यातील प्रमुख नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी, मुक्ताईनगर तालुक्यातील समाजबांधव, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जळगाव महामोर्चाचे नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी, तालुक्यातील विविध भागांतून समाजबांधवांची उपस्थिती आणि मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक तयारी या विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि समाजबांधवाने मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मुक्ताईनगर तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार
जळगाव येथे होणाऱ्या महामोर्चात मुक्ताईनगर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागांत संपर्क व जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्याबाबतही चर्चा झाली.
बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन नाशिक विभाग सचिव के. वाय. जी. सुरवाडे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय वाघ, जिल्हा समाजप्रमुख निलेश सूर्यवंशी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अतुल अटकाळे, राहुल पानपाटील, मुक्ताईनगर शहराध्यक्ष लकी गाढे, रावेर तालुकाध्यक्ष जितू इंगळे, दिपक इंगळे, विक्रम हिरोळे, नाना बोदडे, अमर बोदडे, शैलेश वानखेडे, आशुतोष निकम, राजू वानखेडे, सतीश हिरोळे, रमेश बोदडे, बंटी नरवाड, पृथ्वीराज बोदडे, पत्रकार सचिन झनके, सचिन बोदडे, दिपक गाढे, अजय तायडे, समीर गाढे यांच्यासह मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
बैठकीच्या माध्यमातून आगामी जळगाव महामोर्चासाठी संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग देण्यात आला असून, तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



