बुलढाणाविदर्भ

विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी पातुर्डा हायस्कूलच्या कबड्डी संघाची निवड!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

संग्रामपूर, (पातुर्डा) दि२९/९/२६ सविस्तर वृत्त असे की सन २०२६ ते २७ च्या शालेय क्रीडा स्पर्धेत पी.एम. श्री जिल्हा परिषद हायस्कूल पातुर्डा बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी कबड्डीमध्ये उल्लेखनीय अशा प्रकारची चांगली कामगिरी केली आहे.१४ व १९ 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या दोन्ही संघांनी संग्रामपूर तालुकास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेत १९ 19 वर्षे वयोगटातील संघाने विजयी कामगिरी कायम ठेवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. दरम्यान हा संघ आता मोर्शी येथे होणाऱ्या विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तालुका आणि जिल्हास्तरावर केलेली ही कामगिरी संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावातील शाळेसाठी अत्यंतअभिमानाची बाब ठरली आहे. नियमित सराव, शिस्तबद्ध तयारी आणि खेळाडूंच्या अत्यंत कठीण अशा मेहनतीमुळे हे यश संपादन करण्यात आले आहे. पी. एम. श्री पातुर्डा शाळेचे मुख्याध्यापक श्री मावसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक कराड सर, उभे सर, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंदा ने विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन केले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे पालक, आणि संपूर्ण पातुर्डा गावामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी रुची, आणि यश मिळवण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे पुढील विद्यार्थ्यांना याचे प्रोत्साहन मिळालेले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button