खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामनोरंजनमहाराष्ट्र

रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

जनतेच्या तक्रारींची दखल; महसूल विभागाची मोठी कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा

रावेर ता प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी प्रकरणांमध्ये झालेला विलंब, कामकाजातील अनियमितता तसेच कर्तव्यातील कसूर याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर संबंधित दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार रावेर भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपसंचालक, भूमी अभिलेख, नाशिक प्रदेश यांच्याकडून जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आमदार अमोलभाऊ जावळे यांनी नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करण्यात आली. चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजात शिस्त आणण्याबरोबरच नागरिकांच्या मोजणी व इतर प्रलंबित प्रकरणांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“जनतेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही”

नागरिकांच्या शासकीय कामांमध्ये अनावश्यक विलंब किंवा हलगर्जीपणा झाल्यास त्याची दखल घेतली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button