खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रावेरमध्ये ९ कोतवाल पदांसाठी आरक्षण सोडत पूर्ण; भरती प्रक्रियेला आता वेग!

पिंप्रीसह ८ सजांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित; उमेदवारांच्या नजरा पुढील भरती प्रक्रियेकडे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर

रावेर : रावेर तहसील कार्यालयांतर्गत महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. तालुक्यातील ९ रिक्त पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता रावेर तहसील कार्यालयात पार पडला.

फैजपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी रावेरचे तहसीलदार संजय तायडे, प्रकल्प अधिकारी यांच्या प्रतिनिधी म्हणून राहुल तायडे, सामाजिक न्याय विभागाच्या प्रतिनिधी कोमल तायडे, नायब तहसीलदार आर. डी. पाटील तसेच सहाय्यक महसूल अधिकारी दिपक खैरनार उपस्थित होते.

पिंप्रीसह आठ सजांचा समावेश

रावेर तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदांमध्ये अनुसूचित क्षेत्रातील पिंप्री येथे एक पद, तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील वाघोदा बु., निंभोरा बु., अजंदे, कोचूर बु., रायपूर, थेरोळे, रावेर आणि तांदलवाडी या आठ सजांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ९ रिक्त पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.

सदर आरक्षण हे मागासवर्गीय कक्ष तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांच्याकडून मंजूर बिंदूनामावलीनुसार आणि सन २०११ च्या जनगणनेतील संबंधित सजांच्या प्रवर्गनिहाय लोकसंख्येचा विचार करून निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सजेनिहाय आरक्षण निश्चित

अ.क्र.| सजाचे नाव| निश्चित आरक्षण
१| पिंप्री (अनुसूचित क्षेत्र)| अराखीव
२| थेरोळे| अनुसूचित जाती (महिला)
३| कोचूर बु.| अनुसूचित जाती
४| अजंदे| भटक्या जमाती-ब
५| रावेर| भटक्या जमाती-ड
६| तांदलवाडी| इतर मागास वर्ग
७| वाघोदा बु.| इतर मागास वर्ग (महिला)
८| निंभोरा बु.| SEBC
९| रायपूर| EWS

चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित

अनुसूचित जाती व इतर मागास वर्ग या प्रवर्गांतील महिला आरक्षणाच्या जागांसह SEBC आणि EWS प्रवर्गांचे आरक्षण संबंधित सजांच्या नावांची चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आले. ही प्रक्रिया उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भरती प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष

९ रिक्त पदांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता महसूल सेवक अर्थात कोतवाल पदासाठी इच्छुक उमेदवारांचे लक्ष पुढील भरती प्रक्रियेकडे लागले आहे. प्रशासनाकडून शासनाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने रावेर तालुक्यातील कोतवाल पदांच्या भरतीचा पुढील टप्पा सुरू होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांकडून अधिकृत भरती जाहिरात व पुढील सूचनांकडे लक्ष ठेवले जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button