दि.२८ सप्टेंबरला वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रात जागतिक पर्यटन दिन कार्यक्रम!

कान्हेरी सरफ अकोला येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम!
वृत्त संकलन – विजय मनोहरराव घोडे
आवाज न्यायाचा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
ता.बार्शीटाकळी
दि.२७ सप्टें. | दि.२८ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन २०२६ निमित्त कृषी पर्यटन कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या अमरावती विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्र, कान्हेरी सरप, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यटन संचालनालयाचे संचालक विजय पानसरे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
कार्यक्रमात प्रारंभी नोंदणी, स्वागत, गणेश वंदना आणि मान्यवरांचे संबोधन, जिल्हानिहाय पुरस्कार व प्रमाणपत्र वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी क्षेत्रातील अनुभव आणि आभार प्रदर्शन असे विविध उपक्रम होणार आहेत.
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून कृषी पर्यटनाला चालना देण्याबरोबरच स्थानिक पर्यटनस्थळे, कृषी अनुभव आणि सांस्कृतिक वारसा यांना व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.



