बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त सकाळी सूत्रपठण ,अष्टशील ग्रहण, भव्य शडवरणीय ध्वजारोहण, संध्याकाळी परित्रान पाठ, खीरदान व धम्मदेशना कार्यक्रम उत्साहात संपन्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विनोद तायडे

    ​दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या पावन पर्वावर चिनावल येथील भीम ज्योती बुद्ध विहार येथे परित्रान पाठ, सूत्र पठण, खीरदान आणि धम्मदेशनेचा अत्यंत मंगलमय कार्यक्रम संपन्न झाला.

​या प्रसंगी पूजनीय भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांनी उपस्थितांना अत्यंत सुंदर आणि सविस्तर धम्मदेशना दिली. या कार्यक्रमास चिनावल व परिसरातील धम्म उपासक व उपासिकांची अथांग आणि वंदनीय उपस्थिती लाभली.
​. भीम ज्योती बुद्ध विहाराचे अध्यक्ष आयुष्यमान संजय भालेराव तसेच समिती सदस्य, उपासक-उपासिका संघ यांच्या वतीने सर्व धम्मप्रेमींना आग्रहाचे आवाहन करण्यात येत आहे की,पवित्र वर्षावासाचे आता फक्त ३० दिवस शिल्लक राहिले आहेत. तरी सर्व धम्म उपासक व उपासिकांनी दररोज सकाळी वंदनेला सहा वाजता सायंकाळी ठीक ७:०० वाजता भीम ज्योती बुद्ध विहार येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धम्मदेसनेचा लाभ घ्यावा.
​. आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आज चिनावल येथील धम्म उपासक व उपासिकांमध्ये खूप मोठे वैचारिक परिवर्तन घडताना दिसत आहे. संपूर्ण समाज धम्माच्या मार्गावर आरूढ होत आहे. घरोघरी परित्रान पाठ, मंगल कार्ये आणि तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची व प्रतिमांची सहर्ष प्रतिष्ठापना होत आहे.
​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे —
​”मला असा धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. बुद्ध धम्म हा केवळ कर्मकांड नसून मानवी जीवनाला सन्मार्गावर नेणारी आचारसंहिता आहे.”
​बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला धम्माचा मार्ग हा प्रज्ञा, शील आणि करुणेचा मार्ग आहे. विहारांमध्ये एकत्र येऊन बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे, ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हेच आपले खरे कर्तव्य आहे.
​. उरलेल्या ३० दिवसांच्या वर्षावासात दररोज सकाळी सहा वाजता वंदनेला सायंकाळी ७:०० वाजता बुद्ध विहारात एकत्र येऊया आणि धम्म विचारांची ज्योत घरोघरी आणि मनामनात प्रज्वलित करूया!
​आयोजक:
भीम ज्योती बुद्ध विहार समिती, उपासक-उपासिका संघ, चिनावल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button