खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाद; १५ जणांसह ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा, एक नंबरवरून मिरवणूक नेण्याच्या वादातून घडला प्रकार

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वाशिम प्रतिनिधी

शिरपूर (मालेगाव जिल्हा वाशिम):
गणेश विसर्जन मिरवणुकीत अग्रेसर क्रमाने डीजे व मंडळ ठेवण्याच्या वादातून माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी जनार्दन बाकल (वय ५५, रा. तिवळी) यांच्या मृत्यूप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात १५ जणांसह इतर २० ते २५ जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी ५:३० ते ६:३० वाजेच्या सुमारास तिवळी येथील बसस्थानकासमोर घडली.
मृतक शिवाजी बकाल यांचे सुपुत्र दीपक शिवाजी बकाल (वय ३८, रा. तिवळी) यांनी रविवारी (२७ सप्टेंबर) सकाळी ९:१० वाजता दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एक नंबरवरून मिरवणूक नेण्यावरून वाद
फिर्यादीनुसार, तिवळी येथील बस स्टँडसमोर गणेश विसर्जन मिरवणुकीत १ नंबरचा गणेश मंडळ ठेवण्याच्या कारणावरून जगन्नाथ वाघ व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शिवाजी बकाल यांना उच्च रक्तदाब (बीपी) आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचे ठाऊक असतानाही आरोपींनी निष्काळजीपणे व हयगयीने ट्रॅक्टर चालवून धक्का दिला आणि लोटालोट केली. या प्रकारामुळे शिवाजी बकाल हे अचानक खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

१५ जणांसह ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा
या प्रकरणी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ३३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६ (१), २८८, २८५, १२५ (२), ३५१ (२), ३५२ (३), ३५२ (तसेच जुने भादंवि कलम ३०४-अ, २७९, १४३, ३२३, ५०४, ५०६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार, LCB चे पोलिस निरीक्षक सुभाष आढे, शिरपूरचे ठाणेदार योगिता भारद्वाज, वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक तायडे, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण आणि पोलिस उपनिरीक्षक तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिस निरीक्षक योगिता भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक करुणाशील तायडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यात हळूहळू नोंदवण्यात आले असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button