वीर शिवाजी गणेश मंडळात महाप्रसादाचे आयोजन; गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:स्थानिक सिव्हील कॉलनी येथील वीर शिवाजी गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साही आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
महाप्रसादाच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात श्री सुरेश शिवरकर यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून करण्यात आली. आरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण सुरू झाले. या महाप्रसादाचा लाभ सिव्हील कॉलनी परिसरासह देऊळगाव राजा शहरातील असंख्य गणेश भक्त, महिला, पुरुष आणि लहान मुलांनी घेतला. भक्तांनी अतिशय शिस्तीत आणि उत्साहाने महाप्रसादाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हील कॉलनीतील नागरिक, महिला मंडळ आणि रहिवाशांनी अत्यंत परिश्रम घेतले. सर्वांच्या सामुदायिक सहभागामुळे आणि नियोजनामुळे महाप्रसादाचा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला.



