बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

आदर्श नगर मध्ये आदर्श पद्धतीने गणपतीचे विसर्जन

आदर्श नगर मध्ये आदर्श पद्धतीने गणपतीचे विसर्जन
जी.डी.रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव : आपल्या लहान मुलांना योग्य संस्कार मिळावे व उत्सवाचा आदर्श कसा असावा हे मुलांनी आत्मसात करावे त्याकरिता खामगाव ग्रामीण येथील आदर्श नगर भागातील जनतेने एकमताने निर्णय घेऊन गणपतीचे विसर्जन साध्या पद्धतीने केले.
आज आपण पाहतो गणपती मिरवणूक असो, देवीची मिरवणूक असो वा अन्य कुठल्या महापुरुषांची जयंती ची मिरवणूक असो त्या मिरवणुकांमध्ये कर्कश आवाज करणारे डीजे असतील, झगमग करणारे लेझर लाईट असतील असे अनेक मानवी शरीराला घातक असणारे साहित्य वापरले जाते. अनेक ठिकाणी या साहित्यांमुळे लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्तींना इजा पोहोचल्या आहेत तर काहींना यम सदनी जावे लागले त्यामुळे सरकारने सदर साहित्य वापरण्यावर अनेक बंधने टाकली परंतु राजकीय लोक आपल्या मतांसाठी काही मूठभर लोकांचा लाड पुरवत असून प्रशासकीय यंत्रणेला मज्जाव घालत असावे म्हणून सदर यंत्रणा सुद्धा कुठल्याही फर्स्ट पावले उचलताना दिसत नाही. परंतु खामगाव ग्रामीण येथील आदर्श नगर भागातील साध्या पद्धतीने गणपती मिरवणूक परिसरातील मुले व नागरिकांनी गणपती बाप्पाच्या जयघोषात काढली या जयघोषाने आदर्श नगरी दुमदुमली व मुलांचा उत्साह पाहून अनेकांनी शाबासकीचे शब्द उद्गारवाले व शुभेच्छा दिल्या खरंच या पद्धतीने मिरवणुका निघाल्या व देवी देवतांचा तसेच महापुरुषांच्या इतिहास मुलांसमोर मांडला तर मुलांच्या सुद्धा ज्ञानात भर पडेल त्यांचे ज्ञान वाढून ते देशासाठी आदर्श ठरतील त्यामुळे अशा पद्धतीने मिरवणुका काढाव्या व उत्सवा दरम्यान शारीरिक सांप्रदायिक व कलाकृतीच्या स्पर्धा घेऊन उत्सव साजरा करावा असे यावेळी मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी व्यक्त केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button