खानदेशबुलढाणा

डिग्रस शिवारातील गायरानात १८ वर्षीय युवकाचा मृत्यू; अंढेरा पोलिसांत मर्ग दाखल”युवकाचा मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:तालुक्यातील डिग्रस बुद्रुक शिवारातील गायरान परिसरात एका १८ वर्षीय युवकाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली.

मृतकाचे नाव ओमकार संजय पाटील (वय १८, रा. डिग्रस बुद्रुक) असे आहे. पोलिस नोंदीनुसार, ओमकार याने गायरानातील सिसमाच्या झाडाला साडीच्या पदराच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी रवींद्र तुळशीदास पाटील (वय ३०, रा. डिग्रस) यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिस ठाण्यात कायमी मर्ग क्र. ३२/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची नोंद २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३८ वाजता करण्यात आली. या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल मारुती कायंदे करीत असून, पोलिसांकडून घटनेच्या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button