बुलढाणामहाराष्ट्र

आत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करीत होते!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात थोड्या वेळापूर्वी एक चार चाकी वाहन पेटले. बुलढाणा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने आग विझवली असून ती आटोक्यात आली आहे..

साडेबाराच्या सुमारास सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभी असलेली डस्टर कंपनीची कार पेटली. दरम्यान बॅटरीचा स्फोट झाल्याने कार पेटल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे आंदोलन, उपोषण जे काही होईल ते शांततेच्या मार्गाने होईल अशी प्रतिक्रिया यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button