बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

खैरव येथे तरुणाला जमावाकडून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा; कामानिमित्त दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव येथील नागणगाव टी-पॉईंट परिसरात १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर नंदाजी सोसे (वय ३१, रा. खैरव, ता. सिंदखेडराजा) हे देऊळगाव मही येथे कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. नागणगाव टी-पॉईंट परिसरात आरोपींच्या घरासमोरून जात असताना आरोपी निवृत्ती बद्रीनाथ सोसे व शिवानंद विठोबा सोसे यांनी त्यांना दुचाकीवरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, इतर आरोपी विठोबा रंगनाथ सोसे व बद्रीनाथ कुंडलिक सोसे हे तेथे आल्याने त्यांनीही दगडाने दोन्ही हात व पायावर मारहाण केल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. यावेळी गणेश बाबुराव तळेकर, राजेंद्र तळेकर, रामदास लहाने यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादीची सुटका केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच आरोपींनी जमाव करून शिवीगाळ करत मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याने आपल्याला धोका असल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी निवृत्ती बद्रीनाथ सोसे, शिवानंद विठोबा सोसे, विठोबा रंगनाथ सोसे, बद्रीनाथ कुंडलिक सोसे आणि माणिकराव कुंडलिक सोसे (सर्व रा. खैरव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(1), 115(2), 189, 189(2), 190, 191(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारुती कायंदे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्जुन सांगळे यांनी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button