खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवरून महापौर दीपमाला काळे आक्रमक; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून प्रशासनाला घेतले फैलावर, रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या हॉकर्सवर दंडात्मक कारवाईचे आदेश

जळगाव

प्रमुख गणेश विसर्जन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना, जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आज, शनिवारी (१९ तारीख) सकाळी विसर्जन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. शिवतीर्थ  चौकापासून ते टॉवर चौकापर्यंत केलेल्या या पाहणीदरम्यान रस्त्यांवरील खड्डे, लटकणाऱ्या केबल्स आणि अस्वच्छता पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. “पुढील दोन दिवसांत शहरातील सर्व खड्डे तात्काळ बुजवा. योग्य ती डागडुजी करा. खराब साईडपट्ट्या दुरुस्त करून रस्ते प्लेन करा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. तसेच विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरू शकणाऱ्या रस्त्यावरील लटकत्या वरच्या वायरी आणि केबल्स तात्काळ उंच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

*भर रस्त्यात अस्वच्छता करणाऱ्या हॉकर्सवर संताप*

पाहणीदरम्यान नेहरू चौकात एका हॉकर्सने भर रस्त्यावरच कचरा व अस्वच्छता केल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. यावर तीव्र संताप व्यक्त करत महापौरांनी, “सदर हॉकर्सला तात्काळ दंड करा आणि त्याचे वाहन जप्त करा,” असे आदेश दिले. महापौरांचा आक्रमक पवित्रा पाहून संबंधित हॉकर्सने तात्काळ हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करून दिला.

*कामाच्या दर्जावरून मक्तेदारासह अधिकाऱ्यांना सुनावले*

टॉवर चौकात सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची पाहणी करताना महापौरांनी कामाचा दर्जा तपासला. यावेळी त्यांनी मक्तेदार आणि अधिकाऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत कडक सूचना दिल्या.

शहरातील खड्ड्यांच्या कामाबाबत आणि इतर नागरी समस्याविषयी गेल्या दोन दिवसांपासून नागरिक महापौरांकडे तक्रारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी भाजपाचे गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, शिवसेना (ठाकरे गट) प्रतिनिधी शोएब खाटीक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आर. टी. पाटील, योगेश रंधे आणि अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button