खानदेशमहाराष्ट्रमुबई

खळबळजनक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या २५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई येथील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या जळगावमधील २५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. या घटनेमुळे नेमाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत युवकाचे नाव जयदीप मेघराज नेमाडे (वय २५) असून, तो शहरातील शिरसोली रोड परिसरातील जीवनमोती सोसायटी येथील रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जयदीप नेमाडे हा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई येथे गेला होता. दर्शनासाठी गेल्यानंतर अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचे लक्षात येताच, तेथील पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी जयदीप याचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button