हिंगणा गावात 30 वर्षापासून श्रद्धेची अखंड ज्योत ज्येष्ठ गौरीपूजनाची परंपरा; मोरखडे परिवारात गौरीपूजन मोठ्या उत्साहात……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
हिंगणा:- १८ सप्टेंबर २०२६
बाबुराव मोरखडे यांच्या निवासस्थानी उत्साहात गौरीपूजन आमदार संजय कुटे यांची सदिच्छा भेट. संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा गावात बाबुराव मोरखडे यांच्या निवासस्थानी मागील ३० वर्षांपासून सुरू असलेली ज्येष्ठ गौरीपूजनाची श्रद्धेची आणि परंपरेची अखंड ज्योत यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात तेवत राहिली. मोरखडे परिवाराने जपलेल्या या पारंपरिक गौरीपूजन सोहळ्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठ्या आनंदात साजरा केला. मोरखडे परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ गौरीचे विधिवत पूजन करण्यात आले. घरामध्ये आकर्षक सजावट, धार्मिक वातावरण आणि भक्तिभावाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या या परंपरेमुळे मोरखडे परिवाराच्या गौरीपूजनाला हिंगणा गावात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रसंगी जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय संजयभाऊ कुटे यांनी मोरखडे परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन ज्येष्ठ गौरीचे दर्शन घेतले तसेच मोरखडे परिवाराची आस्थेने भेट घेतली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार संजय भाऊ कुटे यांचे स्वागत केले. श्रद्धा आणि उत्साहाचा संगम ज्येष्ठ गौरीपूजनानिमित्त संपूर्ण गावासाठी स्नेहभोजन हिंगणा गावात धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याची अनोखी परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे. आज या ज्येष्ठ गौरी पूजन निमित्त गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. यावेळी मोरखडे परिवारातील बाबुराव मोरखडे, त्यांच्या पत्नी दीपाली मोरखडे व मुलगा श्रेयस मोरखडे तसेच मोरखडे परिवारातील सदस्य आणि हिंगणा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन दशकांपासून श्रद्धा, संस्कार आणि कौटुंबिक एकोप्याची परंपरा जपणाऱ्या मोरखडे परिवाराच्या ज्येष्ठ गौरीपूजन सोहळ्याने परंपरा आणि आधुनिक काळातील सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम घडवून आणला. तसेच गौरी मातेच्या दर्शनासाठी नातेवाईक आप्तेष्ट आणि गावातील नागरिक आवर्जून उपस्थित राहत असून संपूर्ण परिसय भक्तिमय वातावरण भारावून गेला आहे. तीन शतकांचा वारसा नव्या पिढीकडे काळ बदलला परिस्थिती बदलली पिढ्या बदलल्या मात्र मोरखडे परिवाराची गौरी मातीवरची श्रद्धा आणि परंपरेवरील निष्ठा आजही कायम आहे. घरातील ज्येष्ठांनी सुरू केलेली ही परंपरा पुढील पिढीही तितक्याच भक्ती भावाने पुढे नेत आहे. त्यामुळे ज्येष्ठ गौरी पूजनातून श्रद्धे सोबतच संस्कार आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहे. ही जपलेली तीन शतकांची परंपरा अशीच पुढेही अखंड सुरू राहो आणि गावात सुख-समृद्धी आरोग्य व आनंद नांदो असे भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.



