बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

जळगाव जामोद:- १४ ऑगस्ट २०२६
देवमन दाभाडे यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण भरीव मदतीची मागणी, अन्यथा भव्य आंदोलनाचा इशारा
येनगाव येथील शेतकरी देवमन मरी दाभाडे यांनी ३० व ३१ जुलै २०२६ रोजी आलेल्या महापुरामुळे शेती व केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी १४ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
महापुरामुळे दाभाडे यांच्या शेतीचे तसेच केळी पिकाचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून, या नुकसानीची योग्य ती दखल घेऊन शासनाने तातडीने भरीव मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देत शेतकरी देवमन दाभाडे यांची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवाभाऊ दामोदर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला व नुकसानभरपाई दिली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष देवाभाऊ दामोदर यांनी यावेळी दिला.
“शेतकऱ्यांवर शासनाकडून अन्याय होत असताना वंचित बहुजन आघाडी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय पक्ष शांत बसणार नाही,” अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या भेटीवेळी तालुकाध्यक्ष देवाभाऊ दामोदर, तालुका महासचिव संदीपभाऊ उगले, ज्येष्ठ नेते गुलाबराव आठवले, तालुका उपाध्यक्ष संतोषभाऊ तिजारे, तालुका संघटक श्रीरामभाऊ भिडे, राजू इंगळे, युवा कार्यकर्ता रोशन तायडे, महादेव बोदळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करू”
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button