खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीयवैद्यकीय

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आरोग्य हिरक’ सप्ताह; ५० बालकांची हृदयरोग तपासणी, ११ बालकांना मुंबईत उपचार

मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आरोग्य हिरक’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत किम्स हॉस्पिटल, ठाणे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) जळगाव आणि डॉ. गोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.

या शिबिराला जळगाव जिल्ह्यासह बुलढाणा जिल्हा तसेच बऱ्हाणपूर येथून बालके तपासणीसाठी आली होती. शिबिरात एकूण ५० बालकांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ बालकांना पुढील हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून, या बालकांच्या पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील किम्स हॉस्पिटलमध्ये नियोजन करण्यात आले आहे.

शिबिरात इंटरव्हेन्शनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजीचे मुख्य व वरिष्ठ सल्लागार डॉ. श्रीनिवास लु. यांनी बालकांची तपासणी करून पालकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

⭐ पवन सोनवणे यांचे विशेष योगदान

या संपूर्ण आरोग्य शिबिराच्या आयोजनामध्ये आरोग्य सेवक पवन सोनवणे यांचे मोठे व महत्त्वपूर्ण योगदान लाभले. गरजू बालकांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचवणे, बालकांना तपासणीसाठी आणणे, तसेच संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

पवन सोनवणे यांच्या पुढाकारामुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ५० बालकांची तपासणी होऊन ११ बालकांना पुढील हृदय उपचाराची दिशा मिळाली. त्यामुळे या शिबिराच्या यशाचे श्रेय देताना आरोग्य सेवक पवन सोनवणे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.

तसेच किम्स हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य सेवक नितीन कोळी हे देखील या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते. त्यांनी शिबिराच्या नियोजनात व रुग्णांच्या पुढील उपचारासाठी आवश्यक समन्वयामध्ये सहभाग घेतला.

‘आरोग्य हिरक’ सप्ताहाच्या माध्यमातून गरजू बालकांना वेळेत हृदयरोगाचे निदान आणि पुढील उपचाराची सुविधा मिळाल्याने पालकांनी आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील व आरोग्य सेवक श्री पवन सोनवणे यांचे आभार मानले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button