बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

गणेशोत्सव मंडळातच मिळणार आरोग्यसेवेची माहिती; महसूल योजनांचाही जागर

चिखलीच्या निलकमल गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. 18 : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत चिखली येथील निलकमल गणेशोत्सव मंडळात आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक समुपदेशनासह महसूल विभागाच्या विविध योजना व निर्णयांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.

दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता निलकमल गणेशोत्सव मंडळ, चिखली, जि. बुलढाणा येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती, नागरिकांची आरोग्य तपासणी आणि आवश्यक आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाशी संबंधित शासन आदेश, निर्णय व विविध योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

गणेशोत्सव हा नागरिकांच्या मोठ्या सहभागाचा उत्सव असल्याने या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून माहितीपासून लाभापर्यंतचा दुवा अधिक प्रभावी करण्याचा जिल्हा माहिती कार्यालयाचा प्रयत्न आहे.

नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य तपासणी व शासकीय योजनांची माहिती घेण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button