खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

तिरंगा व राजमुद्रा साकारून संकल्प दिन उत्साहात साजरा

सावदा हायस्कूलमध्ये ३० बाय ३० फुटांची भव्य रांगोळी!

तिरंगा व राजमुद्रा साकारून संकल्प दिन उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर तालुका प्रतिनिधी – विकास आमोदकर

सावदा : सावदा येथील हायस्कूलमध्ये संकल्प दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तब्बल ३० बाय ३० फुटांची भव्य रांगोळी साकारत देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा अनोखा संदेश दिला.

या भव्य रांगोळीत भारतीय तिरंगा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आकर्षक पद्धतीने साकारण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

रांगोळी पाहण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम आणि साकारलेली कलाकृती उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

संकल्प दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून “देश प्रथम” आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान असा संदेश देण्यात आला
आपल्या परिसरातील प्रत्येक बातमी सर्वप्रथम आणि विश्वासाने.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button