खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

रावेर तहसील कार्यालयात आज महसूल लोक अदालत; प्रलंबित प्रकरणांवर तडजोडीची संधी

रावेर तहसील कार्यालयात आज महसूल लोक अदालत; प्रलंबित प्रकरणांवर तडजोडीची संधी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर

रावेर | दि. १७ सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील नागरिकांच्या महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांना तडजोडीच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत आज गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी रावेर तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांमध्ये महसूल लोक अदालत घेण्यात येत असून, त्यामध्ये रावेर तहसील कार्यालयाचाही समावेश आहे. महसुली दावा अथवा अर्धन्यायिक प्रकरण प्रलंबित असलेल्या पक्षकारांना परस्पर संमतीने तडजोड करण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाली आहे.

प्रलंबित प्रकरणांतील संबंधित पक्षकारांनी निर्धारित नमुन्यात अर्ज साद करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसूलविषयक वादांवर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर प्रशासनाचा भर आहे.

रावेर तालुक्यातील नागरिकांनी महसूलविषयक प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून उपलब्ध प्रक्रियेची माहिती घ्यावी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button