बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चंद्रशेखर आजाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा; Z+ सुरक्षा द्या – सुजित बांगर…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

बुलढाणा:- १६ सप्टेंबर २०२६
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन आरोपींसह हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी
आजाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांना शाहाबाद येथील टोल गेटवर अडवून कथितरित्या झालेल्या हल्ल्याची निष्पक्ष, उच्चस्तरीय आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपती महोदया यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान खासदारावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही गंभीर बाब असून, या घटनेची केवळ प्राथमिक पातळीवर चौकशी न करता हल्ल्यामागील संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करण्यात यावा. हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कायद्यानुसार तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या घटनेमागे कोणाचा दबाव, कटकारस्थान किंवा सूत्रधार आहे का, याचाही तपास करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भाई चंद्रशेखर आजाद यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने आढावा घेऊन त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशीही मागणी सुजित बांगर यांनी केली आहे.
लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि राजकीय अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य यांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात केंद्र व संबंधित राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आजाद समाज पार्टीकडून लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी पंकज शेगोकार, शेख आबेद, महादेव जाधव, विजय इंगळे,सागर मोरे,सिद्धांत तायडे, सोपान दाभाडे,अभिजीत कांबळे संदेश वानखडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या निवेदनावर आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button