पायाचा एक्स रे काढण्यासाठी गेलादिला छा तीचा एक्स

पायाचा एक्स रे काढण्यासाठी गेलादिला छातीचा एक्स
रास्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव, ता. २० शहरातील सईबाई मोटे उपजिल्हा शासकीय रूग्णालयात अजब कारभाराचा नमुना पाहावयास मिळाला. या रुग्णालयातील घडलेल्या एका घटनेने रुग्णालयातील कर्मचारी किती बेजबदाररीने काम करतात हे दिसून आले आहे.प्राप्त माहितीनुसार, १७ जून रोजी प्रशांत चांदुरकर यांना पायाचा त्रास होत असल्याने ते सईबाई मोटे रूग्णालयात उपचारासाठी गेले. त्यांना संबंधित डॉक्टरने पायाचा एक्स रे काढण्याचे सांगितले. चांदुरकर यांनी रूग्णालयाच्या एक्स रे विभागात त्यांच्या पायाचा एक्स रे काढून घेतला. दुसऱ्या दिवशी प्रशांत चांदुरकर हे रुग्णालयातील एक्स रे रिपोर्ट घेण्यासाठी गेले. रिपोर्ट घेऊन ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले असता रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी त्यांनामला पायाचा त्रास आहे व मला फुप्फुसाची कोणतीही समस्या नाही असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी एक्स रे रिपोर्टची तपासणी केली असता सदर रिपोर्ट रजत रोकडे नावाच्या रुग्णाचा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.त्यामुळे डॉक्टरांनी चांदुरकर यांना परत जाऊन तुमचा रिपोर्ट घेऊन या, असे सांगितले असता चांदुरकर एक्स रे विभागात गेले आणि त्यांनी रजत रोकडे यांचा रिपोर्ट परत केला आणि त्यांचा स्वतः:चा एक्स रे रिपोर्ट मागितला, तेव्हा त्यांना त्यांच्या पायाचा रिपोर्ट देण्यात आला.मात्र, पुन्हा रिपोर्टवर रजत रोकडे यांचेच नाव कायम ठेवण्यात आले. तसेच केस स्टडीमध्ये चेस्ट हेच कायम होते. मात्र, रिपोर्टमध्ये पायाच्या एक्स रे संदर्भात माहिती होती.



