बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

देऊळगावराजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा : तालुक्यातील मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कारभारासाठी शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या वतीने १५ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या आदेशासोबतच्या विवरणपत्रात पंचायत समिती, देऊळगावराजा अंतर्गत येणाऱ्या २६ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींचा नियमित कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय कामकाजात खंड पडू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विवरणपत्रानुसार, विविध ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच एकात्मिक बालविकास सेवा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षिका यांचा समावेश आहे.

नियुक्त प्रशासकांकडे संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी राहणार आहे. ग्रामपंचायतीशी संबंधित दैनंदिन सेवा, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि शासनाच्या निर्देशानुसार कामकाज सुरू ठेवण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर राहणार आहे.

मंहगाव, होंडा, आंधेरा, पळसखेड जट्टा, बारागाव बु., गिरोली खुर्द, जवळखेड, विचोली बु., पिंपळगाव बु., बोरखेडी बावरा, मेहुणाराजा, उंबरखेड, खाल्याळ गव्हाण, सावखेड नागरे, चिराणी वारमाळ, नागनगाव, पांगरी, जळंद, मेडगाव, पाडळी चिंदे, टाकरखेड, देऊळगावही, साठखेडभाई, निमगाव गुरु, पिंपरी मांगो आणि तुळजापूर या ग्रामपंचायतींचा आदेशातील यादीत समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार प्रशासक नियुक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असून, संबंधित ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार नियुक्त अधिकाऱ्यांकडे राहणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button