Uncategorizedबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बालरोग विभाग आता जिल्हा स्त्री रुग्णालयात ; १४ सप्टेंबरपासून बालरुग्णांसाठी बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा उपलब्ध*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा, दि. १३ : जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील बालरोग विभागाचे जिल्हा स्त्री रुग्णालय, बुलढाणा येथे दि. १४ सप्टेंबर २०२६ पासून स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी बालरोग विभागाच्या बाह्यरुग्ण तसेच आंतररुग्ण सेवा जिल्हा स्त्री रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.

राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय ही दोन्ही रुग्णालये राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त कार्यरत आहेत.

रुग्णालयातील दैनंदिन वाढती रुग्णसंख्या तसेच बालरोग विभागात पदव्युत्तर एम.डी. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णखाटांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (NMC) निर्धारित मानकांची पूर्तता केल्यानंतरच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळते. या पार्श्वभूमीवर बालरोग विभागाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा मिळण्यासाठी लवकरच भारतीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून महाविद्यालयाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. या निरीक्षणादरम्यान रुग्णखाटांबाबत कोणतीही त्रुटी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग विभागाचा बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग जिल्हा स्त्री रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येत आहे.

दरम्यान, नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता कक्ष (NICU) सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असून तो तूर्तास तेथेच कार्यरत राहणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात नवीन NICU उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेला NICU देखील जिल्हा स्त्री रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button