आ.श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वात विकासाभिमुख संघटन उभारण्याचाभाजपा चा संकल्प

देऊळगाव मही येथील भाजप कार्यालयात आढावा; युवक, महिला व ज्येष्ठांच्या प्रश्नांवर काम करण्याचे आवाहन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव मही : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी रविवारी देऊळगाव मही येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी तळागाळातील नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासह त्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
युवक, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर राहावे, असे महाले यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना आणि विकासकामांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याबरोबरच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही भर राहणार असल्याचे महाले यांनी सांगितले. विकासकामांना गती देताना युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. तळागाळातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत युवा नेते गणेश भाऊ नागरे यांनी युवकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. अंढेरा येथील पोलिस वसाहतीचा मुद्दा देखील गणेश नागरे यांनी उपस्थित केला, वसाहतीचा प्रश्न लवकर मार्गी लागावा हा आग्रह या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला,त्याचप्रमाणे मतदारसंघातील युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देतानाच गरजू नागरिकांना शासकीय व प्रशासकीय कामांमध्ये मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून लोकाभिमुख अभियान राबविण्यात येणार असून, विकास आणि रोजगाराच्या संधींसाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नागरे यांनी सांगितले.
आमदार महाले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनात्मक काम अधिक प्रभावी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. प्रतिक्षा गणेश नागरे, सौ. भारती अमोल इंगळे, मंडळ अध्यक्ष प्रभाकर नागरे, मंडळ अध्यक्ष शिवाजी वाघ, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष गणेश हांडे, तालुका उपाध्यक्ष केतन कुलकर्णी, शहर प्रभारी श्रीकृष्ण शिंगणे, शहराध्यक्ष राजेंद्र शिंगणे, किसान मोर्चाचे गणेश पालवे, तालुका सचिव विनोद नागरे, गणेश कुटे, सागर खांडेभराड, शुभम आंधळे, नंदू पवार, सुरेश पवार, प्रविण वाकोडे, अमोल खुपसे, सोपान मोरे, अविनाश पगार, दत्ता खंडागळे, अनिल जायभाये, राहुल जायभाये, अनिल प जायभाये,विष्णू खारडे, पवन काकड, सतीश खंडागळे, गणेश काकड, सतीश नागरे, हरिभाऊ दहातोंडे, स्वप्निल काकड, सुनील पाटोळे, गणेश दहातोंडे, शिवानंद मंटे, राजू जाधव, हरिभाऊ गोमटे, अरुण भागिले, सुभाष बोर्डे, सुखदेव पाखरे, अनिल नागरे, शालिक काकड, गणेश ताठे आदी उपस्थित होते.



