कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात १५४० रुग्णांना लाभ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
सा. आवाज न्यायाचा
अरुणा दत्तात्रय खंडागळे
वारकऱ्यांसाठी आषाढी-कार्तिकी तर रुग्णांसाठी अनुराधापरिवाराची शिबिरे नवसंजीवनी देणारी : पुरुषोत्तम महाराज पाटील
चिखली : वारकऱ्यांच्या जीवनात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जेवढे अनन्यसाधारण स्थान आहे, तेवढेच महत्त्व चिखली तालुका परिसरातील रुग्णांसाठी अनुराधा परिवाराच्या १ मे आणि १२ सप्टेंबर रोजी आयोजित होणाऱ्या आरोग्य शिबिरांना आहे. सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची ही परंपरा केवळ शिबिरांपुरती मर्यादित न राहता हजारो गरजूंच्या जीवनाला आधार देणारी ठरली आहे. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी प्रज्वलित केलेला हा सेवायज्ञ राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वातून आजही अखंड सुरू आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा आवाजाचे जादूगार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.
अनुराधा परिवाराचे जनक कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त मौनीबाबा संस्थान, चिखली येथे शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी भव्य निशुल्क नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा लाभ तब्बल १५४० रुग्णांनी घेतला. त्यापैकी १३० रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मौनीबाबा संस्थान येथे निवड झालेल्या रुग्णांना मोफत चष्माचे वितरण करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील व परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा लोकनेते माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते झाले. पुढे बोलताना ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की, परमार्थाच्या मार्गावर राहून प्रत्येकाला ऋषित्व प्राप्त करता येत नाही. मात्र तात्यासाहेब बोंद्रे यांनी संसारात राहूनही आपल्या कर्मातून ऋषित्व गाठले. तात्यासाहेबांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून सेवेचाच आदर्श समाजासमोर ठेवला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेतून राहुलभाऊ बोंद्रे सामाजिक बांधिलकी जपत असून, तात्यासाहेबांनी उभारलेल्या सेवाभावी विचारांची मशाल ते पुढे नेत आहेत.
बुलढाणा येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास बाहेकर म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये लोक अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: नेत्रविकार ही समस्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळते. वेळेवर निदान झाले नाही तर रुग्णांना दृष्टी गमवावी लागू शकते. अशा वेळी अनुराधा मिशनसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा समाजापर्यंत पोहोचवणे ही अतिशय स्तुत्य बाब आहे. या शिबिरातून हजारो रुग्णांना लाभ झाला असून ही रुग्णसेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवसेवा आहे. या शिबिरास मौनिबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष जितेंद्रदादा बोंद्रे,नंदुभाऊ कऱ्हाडे, श्रीराम भाऊ झोरे,दीपकभाऊ देशमाने, रामभाऊ जाधव, समाधान भाऊ सुपेकर,अशोकराव पडघान, शरदराव पाटील, ईश्वरराव इंगळे,भगवानराव खरात, लक्ष्मणराव भिसे, साहेबराव पाटील, अंबादास भाऊ खरात, बाळासाहेब पवार,जाकीर भाई शेख, भारत देशमाने, अमीन भाई,जाकीर भाई शेख, प्रशांत भटकर, भास्करराव चांदोरे,प्रकाश भाऊ निकाळजे, समाधान अकाळ, डॉ. इसरार शेख, रिजवान शेख, प्रभाकर वाघ, सुरेश इंगळे, ज्ञानेश्वर पंडागळे, चांगदेव खरात, गोकुळ शिंगणे, पुरुषोत्तम वायाळ, शरद बंगाळे, श्रीकृष्ण इंगळे, बळीराम इंगळे, प्रकाश सपकाळ, विजूभाऊ गीते, भाई प्रदीप अंभोरे, विजुभाऊ जागृत, प्रकाश मेहत्रे, सुनील करंडे, विठ्ठल पिवळ, प्रकाश चव्हाण, गजानन जाधव,नितीन गायके प.रा.मौ.शि.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथजी यादव, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वानेरे, आत्माराम देशमाने, वर्धमान डहाळे, अथरुद्दीन काझी, प्राचार्य विजय लहाने,प्राचार्य डॉ. अरुण ननई,कॅम्पस डायरेक्टर तथा प्राचार्य डॉ. कैलास बियाणी, प्राचार्य डॉ. रवींद्र काळे, प्राचार्य डॉ. रमेश पागोरे, प्रा.उन्मेष जोशी, प्रा.श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते.
या वैद्यकीय तज्ञांनी दिली शिबिरात सेवा*
शिबिरात रुग्णांची नेत्र तपासणी, औषधांचे वितरण, प्राथमिक नेत्र उपचार करण्यात आले.तसेच मोफत नंबरचे चष्मे वितरीत करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये बुलढाणा येथील सुप्रसिद्ध डॉ.सुभाष जोशी,डॉ. विकास बाहेकर,डॉ. दीपाली पाटील,चिखली येथील डॉ.राहुल जोशी,डॉ.पंकज शेटे,डॉ. कुलदीप भोलाने, डॉ.प्राची बियाणी,भारती विद्यापीठ पुणे, डॉ. अद्वैत बोंद्रे,जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाणा यांची टीम डॉ. हेमंत भिलावेकर, डॉ. योगेश पोळ, डॉ. प्रवीण सोळंकी, डॉ. ज्ञानेश्वर गाडेकर,डॉ. राजेंद्र सवडतकर, डॉ. व्हि.आर जाधव, डॉ . अनुराधा हिवरडे, डॉ.चवथनकर ग्रा.रु.बदनापूर ग्रामीण रुग्णालय चिखली येथील डॉक्टरांची टीम, शासकीय रुग्णालय अकोला येथील डॉ. ललित चव्हाण, डॉ.रमेश नंदनवार, यांनी आपली सेवा बजावली. तसेच टेक्निशियन निलेश सांगळे,ईश्वर सरनाईक, अक्षय पाटील व सूरज चुनावले विलास इंगळे, रोहन चव्हाण यांनी तांत्रिक सहाय्य पुरविले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसीच्या संपूर्ण प्राध्यापकवर्ग आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. उन्मेश जोशी यांनी केले.



