बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथे भारतीय बौद्ध महासभा जळगाव जामोद तालुका पदाधिकारी यांची सदिच्छा भेट…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

हिंगणा:- २ सप्टेंबर २०२६
वर्षावासाच्या निमित्ताने हिंगणा कवठळ गावात सुरू असलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या वाचन उपक्रमाला जळगाव जामोद तालुका माजी अध्यक्ष साहेबराव भगत आणि त्यांची सहकारी तसेच जिल्हा संघटक तथा तालुका प्रभारी भाऊराव गव्हांदे आणि त्यांचे सहकारी यांनी भेट देऊन उपस्थित उपासक-उपासिकांना मार्गदर्शन केले. हिंगणा कवठळ या छोट्याशा गावामध्ये सुरू असलेल्या या ग्रंथवाचन उपक्रमाला गावातील बौद्ध समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नियमितपणे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन व त्यातील विचार समजून घेण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याच उपक्रमाची पाहणी करण्यासाठी साहेबराव भगत व भाऊराव गव्हांदे यांनी गावाला भेट दिली.
यावेळी सुजाता महिला मंडळ, नमो बुद्धाय मंडळ तसेच इतर मंडळांचे पदाधिकारी, उपासक, उपासिका आणि उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या सहभागातून ग्रंथवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
जळगाव जामोद माजी तालुका अध्यक्ष साहेबराव भगत यांनी ग्रंथातील विविध प्रसंग व विचारांचे सविस्तर वाचन करून त्याचा सोप्या भाषेत अर्थ स्पष्ट केला. केवळ ग्रंथाचे वाचन न करता त्यामागील विचार, भगवान बुद्धांचा धम्म, त्यातील तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवनात त्याची उपयुक्तता याबाबत उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. तसेच ग्रंथातील विषयांची फोड करून उदाहरणांसह स्पष्टीकरण देण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रंथवाचनाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्ञान, प्रबोधन आणि वैचारिक जागृती निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गावागावांत अशा प्रकारचे ग्रंथवाचनाचे उपक्रम सातत्याने सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीदरम्यान उपस्थित उपासक-उपासिकांनी ग्रंथातील विविध विषयांवर चर्चा केली. त्यामुळे हिंगणा कवठळ येथील ग्रंथवाचन उपक्रमाला अधिक बळ मिळाले असून, गावात बुद्ध, धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ज्ञानजागर निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले. ग्रंथवाचन, मार्गदर्शन आणि विचारांची देवाणघेवाण अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button