ओसाड पडलेल्या कोंडवाड्याचे पुनर्वसन करून महापुरुषांचे स्मारक उभारा.विजय इंगळे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.१/९/२०२६.
शेगाव तालुक्यातील माटरगाव बु. येथील गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला कोंडवाडा हा घाण. कचरा आणि दुर्गंधीचे स्थान बनले आहे. यामुळे ही जागा गावाच्या उपयोगी न पडता रोगराई पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा ज्योतिराव फुले. राजश्री शाहू महाराज. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे. अशी मागणी विजय इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. याबाबत 27 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
फडका कोंडवाडा हटवून त्या जागेचा सामाजिक आणि विधायक उपयोग करावा. तसेच महापुरुषांचे विचार जतन करून त्या विचारातून समता. एकता. बंधुत्व. आणि सामाजिक सखोल याचे वातावरण निर्माण करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी आजचा समाज पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते…






