बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. १ : बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या मानसिक परिवर्तनासाठी जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून विविध प्रशासकीय व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कारागृहातील बंदी आपल्या नातेवाईकांपासून दूर असल्याने त्यांना रक्षाबंधनाची उणीव भासू नये तसेच त्यांच्या मनात आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जीवनविद्या मिशनच्या सदस्यांनी कारागृहातील सर्व बंदी तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहबंध जपला. या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊन सकारात्मक वातावरण तयार झाले. कार्यक्रमास कारागृह अधीक्षक मेधा बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक तसेच जीवनविद्या मिशनच्या भुपाली तायडे, मंगला अनासने, मिनाक्षी बंड, गजानन उमाळे व संदीप तायडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार संजय मदरकर, कारागृह शिपाई राहुल पवार, आनंद पवार, दीपक वाघ यांच्यासह कारागृहातील इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button