बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दिव्यांग महिलेच्या मदतीसाठी मनसेची धाव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मदत मागील चार महिन्यांपासून मिळाली नसल्याने शहरातील आदर्शनगर येथील दिव्यांग लाभार्थी सरला महेश वाघमारे आर्थिक अडचणीत सापडल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनात म्हटले आहे. त्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने खात्यात जमा करावे, अशी मागणी मनसेच्या शेगाव शाखेने तहसीलदारांकडे केली आहे.
निवेदनानुसार, वाघमारे यांना ऐकण्यास व बोलण्यास अडचण असल्यामुळे शासकीय कार्यालयात जाऊन स्वतःची समस्या मांडताना अडथळे येतात.
त्यातच चार महिन्यांपासून योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. प्रशासनाने त्यांच्या परिस्थितीचा संवेदनशीलतेने विचार करून रखडलेल्या अनुदानाबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निराधार आणि दिव्यांग व्यक्तींसाठी अशा योजनांचे आर्थिक साहाय्य महत्त्वाचे असते. मात्र, स्वतःच्या अडचणी व्यक्त करू न शकणाऱ्या किंवा कार्यालयात प्रत्यक्ष येऊ न शकणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. शासकीय योजनांचा
लाभ गरजूंना मिळवून देणे ही प्रशासकीय जबाबदारीसोबतच माणुसकीची बाब असल्याचे मनसेने निवेदनात अधोरेखित केले आहे.
संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून चार महिन्यांचे थकीत अनुदान जमा करावे, तसेच यापुढे अनुदान नियमित मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीचे निवेदन ता. अध्यक्ष नितिश भावरकर, समाधान शेगोकार, रामा इंगळे, सचिन नागे, देवा चिमनकर यांनी केली असून मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button