जळगावा जिल्हामहाराष्ट्र

लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त सोहळ्यातील जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेच्या कला शिक्षिका ए. डी. भोळे यांनी रेखाटली आमदार साहेबांची आकर्षक रांगोळी.

लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त सोहळ्यातील जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेच्या कला शिक्षिका ए. डी. भोळे यांनी रेखाटली आमदार साहेबांची आकर्षक रांगोळी.
खान्देशचे ज्येष्ठ नेते व लोकनेते एकनाथरावजी खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी पदार्पणाचे औचित्य साधून जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथील कला शिक्षिका ए. डी. भोळे यांनी रांगोळीच्या माध्यमातून नाथाभाऊंचे अत्यंत हुबेहूब आणि अप्रतिम रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन केले आहे. या कलाकृतीतून त्यांनी नाथाभाऊंना अमृत महोत्सवाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
​या भव्य रांगोळीमध्ये लोकनेते नाथाभाऊ खडसे यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व अतिशय बारकाईने साकारण्यात आले आहे. सोबतच, डाव्या कोपऱ्यात आदिशक्ती मुक्ताईची सुंदर प्रतिमा रेखाटण्यात आली असून, खाली “लोकनेते नाथाभाऊ अमृत महोत्सव” असे आकर्षक अक्षरांत लिहिले आहे. रांगोळीच्या चारही बाजूंनी पानाफुलांची नेत्रदीपक आरास करण्यात आल्यामुळे ही कलाकृती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.या आनोख्या कलाविष्कारातून शुभेच्छांबद्दल
कला ​शिक्षिका ए. डी. भोळे यांच्या या कल्पक आणि उत्कृष्ट कलागुणांचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button