चिखली तालुक्यातील चंदनपूर येथील विविध पक्षांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश!आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी हाती घेतला भगवा; शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली- दि. ३० ऑगस्ट
चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्राम चंदनपूर येथील विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री. संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे चंदनपूर परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे आज दि. ३० ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते तथा युवा नेतृत्व मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीकांतभैय्या गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदनपूर येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी नव्याने शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. पक्षाची विचारधारा, आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या लोकहिताच्या उपक्रमांवर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ग्रामीण भागातील युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेच्या विचारांशी जोडले जात असल्याने आगामी काळात पक्षसंघटनेला याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना महिला आघाडी समन्वयक अनुजाताई सावळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोषराव वाकडे, सरपंच मनोज लाहुडकर, विष्णू मेथे, पिंटू गायकवाड, विलास भवर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच गावागावांत शिवसेनेची विचारधारा आणि लोकहिताची भूमिका पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
चंदनपूर येथील या सामूहिक पक्षप्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात आणखी मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेशी जोडले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला…!




