पत्रकार छोटू कांबळे यांच्या पत्रकारितेचा मानाचा गौरव!

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस दै. आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ना. प्रतापराव जाधव, श्री. विद्याधर महाले यांच्या हस्ते सत्कार
चिखली लोकप्रिय, निडर दैनिक “आम्ही चिखलीकर”चे मुख्य संपादक तथा युवा पत्रकार छोटू सुधाकर कांबळे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याबद्दल दि. २९ ऑगस्ट रोजी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापरावजी जाधव साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खासगी सचिव विद्याधर महाले साहेब यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन छोटू कांबळे यांचा गौरव करण्यात आला.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडणे आणि स्थानिक घडामोडींना निर्भीडपणे प्रसिद्धी देण्याच्या कार्याची दखल घेत श्री. छोटु कांबळे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, या सत्कारामुळे त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते डॉ. प्रतापसिंह राजपूत, नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, भास्कर राऊत, चिखली तालुकाप्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख विलास घोलप, महिला जिल्हाप्रमुख मायाताई मस्के, अनुजाताई सावळे, नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. भागवत राजपूत, डॉ. पंढरी इंगळे, कपिल खेडेकर, युवा सेना विधानसभा संपर्कप्रमुख अनमोल ढोरे, चिखली युवा सेना तालुकाप्रमुख गोपीनाथ लहाने, युवा सेना शहरप्रमुख राजेश पवार, विशाल इंगळे, गणेश भवर, पवन चिंचोले, विष्णु आव्हाळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. प्रतापराव जाधवांकडून कांबळेंच्या पाठीवर कौतुकाची थाप
केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापरावजी जाधव यांनी युवा पत्रकार छोटू सुधाकर कांबळे यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. निर्भीड व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेसाठी मिळालेला हा सन्मान अभिमानास्पद असल्याचे सांगत, कांबळे यांच्या पुढील वाटचालीस ना. जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या प्रोत्साहनामुळे पत्रकार छोटू कांबळे यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीला निश्चितच नवी ऊर्जा मिळाली…✍️



