चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्राम.किन्होळा येथे ‘जय अंबे कावड यात्रा’ उत्साहात; युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी घेतले मनोभावे दर्शन,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी- प्रशांत चव्हाण
बुलढाणा – श्रावण सोमवारनिमित्त निघालेल्या कावड यात्रेत शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; भक्तिमय वातावरणात रंगला सोहळा
किन्होळा | दि. ३१ ऑगस्ट २०२६
श्रावण मासातील पवित्र सोमवारचे औचित्य साधून चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्राम किन्होळा येथे ‘जय अंबे कावड यात्रा’ वर्ष २ रे या भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. जय अंबे कावड यात्रा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत गावातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तीमय वातावरण निर्माण केले.
या कावड यात्रेदरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. श्री. संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र तथा बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सदिच्छा भेट देत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कावडधारी शिवभक्तांशी संवाद साधत यात्रेच्या आयोजनाबद्दल समितीचे कौतुक केले.
कावड यात्रेदरम्यान शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ‘हर हर महादेव’, ‘जय अंबे’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात कावडधारी शिवभक्तांसोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनीही मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या भक्तीला विशेष महत्त्व असून, त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कावड यात्रेत श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. गावातील युवकांसह नागरिक, माता-भगिनी आणि शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे, विजय बाहेकर, अमोल बाहेकर, सचिन बाहेकर, संतोष बाहेकर, सचिन सावळकर यांच्यासह जय अंबे कावड यात्रा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील नागरिक, युवक, माता-भगिनी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय अंबे कावड यात्रा वर्ष २ रे निमित्ताने किन्होळा येथे पार पडलेल्या या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्रावण सोमवारच्या पावन पर्वावर विशेष धार्मिक आणि उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.




